welcome to the sw tours and car rental services official site
top of page
Search

वयाची चाळीशी ओलांडण्याआधी `ही` ठिकाण फिरुन घ्या

ऋषिकेश हे उत्तराखंडमधील हिमालयाच्या पायथ्याशी वसलेले एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. येथे बंजी जंपींग, रिव्हर राफ्टिंग, पॅराग्लायडिंगसारखे थरारक अनुभव घेण्यासाठी पर्यटक येथे येतात. 


स्कुबा डायव्हिंगचा थरारक अनुभव घ्यायचा असेल तर महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग येथील समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या. 


लेह लडाख हे सर्वात साहसी पर्यटनस्थळ आहे. जगभरातील पर्यटकांची लेह लाडखला भेट देण्याची इच्छा असते. लेहमध्ये सामान्यपेक्षा आॅक्सीजन कमी आहे आणि वर चढल्यावर ती आणखी कमी होऊ लागते.



आशिया खंडातील सर्वात खोल दऱ्यांमध्ये अहमदनगर जिल्ह्यातल्या साम्रद या गावातील ‘सांधण व्हॅली’चा दुसरा क्रमांक लागतो. या दरीतून जाणारी चिंचोळी वाट पुढे इतकी निमुळती होत जाते की, कित्येक ठिकाणी सूर्याचा प्रकाश जमिनीपर्यंत पोहचत नाही. 

हरिहर हा महाराष्ट्रातील सर्वात धोकादायक किल्ला आहे. लोक जीव धोक्यात घालून येथे ट्रेकिंग करतात.  90 अशांवर चढाई करताना डोळे गरगरतात.


कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील माऊंट एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाते. प्रत्येक ट्रेकरच्या बकेट लिस्टमध्ये कळसुबाई शिखर नक्की असते. मात्र, हे शिखर सर करणं सोपं काम नाही.




 
 
 

Comments


bottom of page