welcome to the sw tours and car rental services official site
top of page

खडकावर उगवलेला फुलांचा स्वर्ग... कास पठार... !!



खडकावर उगवलेला फुलांचा स्वर्ग... कास पठार... !!

आता सप्टेंबर च्या या आठवड्यात आणि पुढच्या दोन आठवड्यात कास पठारावर फुलांच्या रंगाचा आसमंत दिपवून टाकणारा उत्सव सुरु आहे... नजर जाईल तिथं पर्यंत फुलं अगदी क्षिताजाला टेकून आभाळालाच लटकलेत कि काय असं भासणार हे दृष्य... मनाचं फुलपाखरू व्हावं आणि फुलांच्या ताटव्यावर विहारत राहावं असं तल्लीन करणारं मंत्ररलेलं वातावरण... धुक्याच्या दुलईन अच्छादलेला आसमंत... माझ्या कल्पनेतला हा स्वर्ग... !!

हे झालं डोळ्याला सुखावणार.. मनाला रिझवणारं.. . पण कासची ओळख याच्या पुढची जगाच्या नकाशावर आहे. ती मला अधिक महत्वाची वाटते...जैवविविधता म्हणून जे या सृष्टीच्या असण्याला आकार देते.. त्याची श्रीमंती मोजण्याचे जे प्यारामीटर आहेत... इतर ठिकाणी तुम्हाला पाह्यला मिळणार नाहीत अशा दुर्लभ आंतरराष्ट्रीय स्तरावरल्या स्पेसीज इथं मिळतात म्हणून हे कास पठार जगातल्या महत्वाच्या जैवाविविधता असलेल्या ठिकाणा पैकी एक असल्यामुळे याला जागतिक हेरिटेजचा दर्जा आहे.

कोणते असतात हो हे फुलं? वायतुरा ही स्पेसीज सातारीतूरा म्हणून ही ओळखली जाते...कंदाला जाड लांब पाण येतात.. त्यातून एका पांढऱ्या फुलांचा तुरा येतो... कळलावी नाव ऐकूनच उडतो आपण ही जहाल विषारी स्पेसीज आहे... वर लाल आणि खाली पिवळं फुलं लागलेलं असतं दिसायला खूप मनमोहक असतं.... सीतेचे आसवे ही स्पेसीज निळ्या रंगाची असून मध्ये पांढरट कलर असतो ती सप्टेंबर मध्येच दिसते. रावणानी सीतेचे हरण केले त्यावेळी तिचे आसवं फुलावर पडली म्हणून तेवढा भाग पांढरा झाला बाकी फुलं निळ राहिलं अशी दंत कथा लोकांनी या फुलांशी जोडली म्हणून यांचे नाव सीतेची आसवं असे पडले... ही स्पेसीज आपल्या अंगभूत गंधानी कीटकांना जवळ बोलावते आणि त्याच्या बुडाला चिकट गाठ असते... ती या कीटकांना खेचून घेते... ह्या आणि अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण स्पेसीज जगात फक्त इथेच भेटतात... या स्पेसीजच्या प्रत्येक सवयीचे निरीक्षण नोंदविणारे वनपाल श्रीरंग शिंदे हे या 1200 हेक्टर एवढ्या विस्तीर्ण पठारावर पसरलेल्या फुलांचे चालते बोलते कोष आहेत. मित्रहो कास रंगाची तर उधळण तर करतच पण अनेक चमत्कारिक स्पेसीजचा जन्म या पठारावर या दोन महिन्याच्या काळात होतो ते बघणं म्हणजे एका अलौकिक आनंदाची अनुभूती असतें... फोटो काढून फक्त सोशल मीडियावर अपलोड कारण्याएवढं सीमित हे कास पठारावरच्या फुलांचे विश्व् नाही हे सांगण्यासाठी हा लेख प्रपंच.... !!



 
 
 

Comments


bottom of page